नवी दिल्ली: आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघाने आपल्या ‘Retained’ आणि ‘Release’ केलेल्या खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केली आहे.

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील एमआय संघाने एकूण २० खेळाडूंना कायम ठेवले आहे, ज्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, फ्रेंचायझीने ट्रेडद्वारे एक मोठा बदल केला आहे.
महत्त्वपूर्ण ट्रेड: शार्दुल ठाकूर एमआयमध्ये
मुंबई इंडियन्सने एक महत्त्वाचा ट्रेड करत अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याला लखनौ सुपर जायंट्सकडून संघात घेतले आहे. या ट्रेडमध्ये शार्दुल ठाकूरच्या बदल्यात अर्जुन तेंडुलकर याला लखनौकडे पाठवण्यात आले आहे. म्हणजेच, अर्जुन तेंडुलकर आता एमआयसाठी खेळणार नाही.
कायम राखलेले खेळाडू
एमआय संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे:
- हार्दिक पंड्या (कर्णधार)
- रोहित शर्मा
- सूर्यकुमार यादव
- एएम गझनफर
- अश्वनी कुमार
- कॉर्बिन बॉश
- दीपक चहर
- जसप्रीत बुमराह
- मयंक मार्कंडे (ट्रेड)
- मिचेल सँटनर
- नमन धीर
- रघु शर्मा
- राज अंगद बावा
- रॉबिन मिंझ
- रायन रिकेल्टन
- शार्दुल ठाकूर (ट्रेड)
- टिळक वर्मा
- ट्रेंट बोल्ट
- विल जॅक्स
- रॉबिन बॉश रिलीज केलेले खेळाडू
एमआय संघाने आठ खेळाडूंना रिलीज केले आहे, ज्यात बेव्हॉन जेकब्स आणि रीस टोपले यांचा समावेश आहे:
बेव्हॉन जेकब्स
कर्ण शर्मा
लिझार्ड विल्यम्स
मुजीब उर रहमान
पीएसएन राजू
रीस टोपले
विघ्नेश पुथूर
केएल श्रीजीथ
एमआय शिल्लक ‘पर्स’
आठ खेळाडूंना रिलीज केल्यानंतर, मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये २.७५ कोटी रुपये शिल्लक आहेत. मिनी लिलावात खेळाडूंना बोली लावण्यासाठी फ्रँचायझी या रकमेचा वापर करेल.