‘वाराणसी’ भारतातील सर्वात महागडा चित्रपट; संपूर्ण माहिती जाणून घ्या…

Spread the love

हैदराबाद: एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित ॲक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटावरून अखेर पडदा उचलला गेला आहे. सुपरस्टार महेश बाबू याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक आणि त्यांचा जबरदस्त फर्स्ट लूक आज हैदराबादमध्ये आयोजित भव्य “ग्लोबट्रॉटर” कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. चाहत्यांनी या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत केले.

या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटाचे मुख्य कलाकार महेश बाबू, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आणि खलनायक पृथ्वीराज सुकुमारन यांनी हजेरी लावली, ज्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

महेश बाबूचा भयंकर अवतार

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते ‘वाराणसी’ या चित्रपटाचे शीर्षक आणि महेश बाबू याचं नवं पोस्टर. या पोस्टरमध्ये महेश बाबू एका अत्यंत उग्र आणि शक्तिशाली अवतारात दिसत आहेत. त्यांचा चेहरा रागावलेला, जखमी असून ते एका नंदीवर (बैल) बसून हातात त्रिशूळ घेतलेले दिसत आहेत. हा पौराणिक आणि धाकड लूक प्रदर्शित होताच इंटरनेटवर खळबळ माजली असून, युजर्सनी या चित्रपटाला आधीच ‘ब्लॉकबस्टर’ घोषित केले आहे.

“ग्लोबट्रॉटर” कार्यक्रमादरम्यानचे महेश बाबू यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता तपकिरी रंगाचा जॅकेट आणि बेज रंगाचा शर्ट घालून, गळ्यात त्रिशूळ लॉकेटसह अत्यंत डॅशिंग दिसत आहे.

पॅन-इंडियन महानाट्य

बाहुबली आणि आरआरआर च्या प्रचंड यशानंतर, राजामौली आता वाराणसी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा ही जोडी प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

प्रियांका चोप्रा ‘मंदाकिनी’ हे पात्र साकारणार आहे. तिच्या आधीच प्रदर्शित झालेल्या लूकमध्ये ती पिवळ्या साडीत, हातात बंदूक घेतलेली दिसली होती.
पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात एका शक्तिशाली खलनायकाची भूमिका साकारणार आहे, ज्याचा फर्स्ट लूकही यापूर्वी समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *